esakal | श्रावणातल्या शनिवारी भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

खुलताबाद ः भद्रा मारुतीच्या मूर्तीची चॉकलेट्‌सने आकर्षक सजावट करण्यात आली होती.

येथील ग्रामदैवत भद्रा मारुतीच्या दर्शनाला श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी (ता.24) भाविकांनी मोठी गर्दी केली. आज शासकीय सुटी असल्याने भाविकांनी दर्शनाबरोबरच पर्यटनाचे नियोजन केले होते. यंदाच्या या श्रावण शनिवारी भद्रा मारुतीची मूर्ती विविध चॉकलेट्‌सद्वारे आकर्षकपणे सजविण्यात आली होती.

श्रावणातल्या शनिवारी भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी गर्दी

sakal_logo
By
देवदत्त काेठारे

खुलताबाद, ता. 24 (जि.औरंगाबाद) ः येथील ग्रामदैवत भद्रा मारुतीच्या दर्शनाला श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी (ता.24) भाविकांनी मोठी गर्दी केली. आज शासकीय सुटी असल्याने भाविकांनी दर्शनाबरोबरच पर्यटनाचे नियोजन केले होते. यंदाच्या या श्रावण शनिवारी भद्रा मारुतीची मूर्ती विविध चॉकलेट्‌सद्वारे आकर्षकपणे सजविण्यात आली होती. सदरील आकर्षक सजावट जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांच्या सहकार्याने जयसुख पटेल, वल्लभ लड्डा, संजय काळे, निखिल पटेल, मोहित पटेल यांनी दोन दिवस परिश्रम घेऊन साकारली. भाविक भद्रा हनुमान की जयचा जयघोष करीत होते. पावसाने दिलेली उघडीप अन्‌ सलग सुटी यामुळे भाविक दर्शन अन्‌ पर्यटनाचा आनंद घेत होते.


श्रावण शनिवारनिमित्त परिसरातील भाविकांसाठी संस्थानच्या भक्तनिवास सभागृहात सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालय, लायन्स क्‍लब औरंगाबाद व भद्रा मारुती संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सर्व रोग निदान शिबिरात विविध रोगांवरील रुग्णांना तपासून मोफत औषधी देण्यात आली. यावेळी भद्रा मारुती संस्थानचे विश्वस्त राजेश भारुका, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे, दौड यांनी सहकार्य केले. तर, शिबिरात महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय पथकाने रुग्णांची तपासणी केली.


वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी शनिवारी चांगलीच गर्दी झाली होती. या ठिकाणी दर्शनानंतर भाविक जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या बघण्याचा आनंद घेत होते. त्यामुळे लेणी ते मंदिर रस्त्यावर वारंवार वाहतूक विस्कळित होत होती.

loading image
go to top