भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी खुलताबादेत गर्दी

देवदत्त काेठारे
रविवार, 18 ऑगस्ट 2019

येथील ग्रामदैवत भद्रा मारुतीच्या दर्शनाला श्रावणातल्या तिसऱ्या शनिवारी (ता.17) भाविकांनी मोठी गर्दी केली. योगायेगाने या शनिवारी शासकीय सुटी आल्याने भाविकांनी दर्शनाबरोबरच पर्यटनाचे नियोजन केले होते.

खुलताबाद  (जि.औरंगाबाद ) ः येथील ग्रामदैवत भद्रा मारुतीच्या दर्शनाला श्रावणातल्या तिसऱ्या शनिवारी (ता.17) भाविकांनी मोठी गर्दी केली. योगायेगाने या शनिवारी शासकीय सुटी आल्याने भाविकांनी दर्शनाबरोबरच पर्यटनाचे नियोजन केले होते.

यंदाच्या या श्रावण शनिवारी भद्रा मारुतीची मूर्ती सफरचंदाच्या फुलांबरोबरच गुलाबाच्या पाकळ्यांनी आकर्षकपणे सजविण्यात आली होती. भाविक दर्शन घेऊन भद्रा हनुमान की जयचा जयघोष करीत होते.

पावसाने दिलेली उघडिप अन्‌ सलग सुटी यामुळे भाविक दर्शन अन्‌ पर्यटनाचा आनंद घेत होते. वेरूळ येथील 12 वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठीही श्रावणी शनिवारी चांगलीच गर्दी झाली होती. या ठिकाणी दर्शनानंतर भाविक जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या बघण्याचा आनंद घेत होते. त्यामुळे लेणी ते मंदिर रस्त्यावर वारंवार वाहतूक विस्कळित होत होती. ती सुरळीत करण्यासाठी पुरती दमछाक झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees crowded In bhadra maruti