Yermala News : येरमाळ्यात जमला येडाईच्या चैती पुणवला भाविकांचा मेळा

श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला आज शनिवार पौर्णिमेपासूनच पासून प्रारंभ झाला.
shri yedeshwari devi chaitra pournima yatra
shri yedeshwari devi chaitra pournima yatrasakal
Updated on: 

येरमाळा - श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला आज शनिवार पौर्णिमेपासूनच पासून प्रारंभ झाला असून, यात्रेसाठी लाखो भाविक शुक्रवार पासुनच भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले आहेत. यात्रेचा मुख्य विधी अर्थात चुना वेचण्याचा कार्यक्रम आज रविवार सकाळी १० वा. होणार असल्याने भाविकांची संख्या आणखी वाढणार आहे. सर्वत्र आई राजा उदो उदोच्या जय घोषाने येरमाळा नगरी दुमदुमूनन गेली आहे.

शनिवारी (ता. १२) चैत्र पौर्णिमे निमित्त मंदिरात देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी येडेश्वरी देवी चैत्र पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मिळेल त्या वाहनाने भाविक येरमाळा नगरीकडे दाखल होत आहेत.

येरमाळ्याच्या शिवारात, रस्त्याकडेला, शेतात झाडाखाली भाविकांनी जागा दिसेल तिथे राहुट्या मारल्या आहेत. झाडाचा आधार घेत अनेकांनी सावल्या शोधल्या असून विशेष दोन दिवसांचा मुक्कामाची तयारी केली आहे.

shri yedeshwari devi chaitra pournima yatra
shri yedeshwari devi chaitra pournima yatrasakal

गेल्या आठवडा भपासून काल शुक्रवारी झालेल्या पावसाने शनिवारी उष्णतेची लाट असल्याने आजही उन्हाचा पारा ३८ अंशावर असूनही भाविक देवीच्या श्रद्धेपोटी उन्हाची पर्वा न करता देवीच्या भक्तिरसात गुंग झाल्याचे चित्र येडेश्वरी मंदिर परिसरात दिसतं होते. मंदिराच्या चोही बाजुला दिसेल तिथं पर्यंत भाविकांची गर्दी दिसत आहे.

चैत्र पोर्णिमा यात्रेला रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा नवीन आलेल्या धान्याचा देवीला पुरणपोळीचा मान आहे, तर आमराईत पालखीला वड्या,भाकरीचा नेवैद्यचा मान आहे. आज पोर्णिमेचा नेवैद्य करण्यासाठी तीन दगडाची चूल मांडून नेवैद्य करत असल्याचे चित्र दिसेल तिथे दिसत होते.

तो देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी भावकांची धावपळ सुरू होती. पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवल्यानंतर सर्व भाविक आराध्याच्या गीतात रंगून गेले संबळ, जहाजाच्या, ढोलकीच्या, हलगीच्या, तालावर आराधी गाण्यावर भाविकांना ठेका धराला होता.

या आनंद उत्सवाचे चित्र डोळे भरुन पाहण्यासाठी कांही भाविकांनी गर्दी केल्याचे दिसत होते. रात्री नऊ वाजता देवीची चैत्र पोर्णिमेनिमित्त महापूजा, आरती करुन देवीच्या छबिण्याचा कार्यक्रम पार पडला.

मंदिर परिसरातील सर्व लहान मोठ्या देवाच्या मंदिरात आरत्या करुन देवीच्या पालखी छबीण्याची मिरवणूक पार पडली. यावेळी ठीक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने यात्रेला छावणीचे स्वरुप आल्याचे दिसतं होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com