नागवेलीची पाने, सुक्‍या मेव्याने भद्रामारुतीची आकर्षक सजावट

देवदत्त काेठारे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

रावण महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी (ता. दहा) हजारो भाविकांनी येथील जागृत देवस्थान भद्रामारुतीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भद्रामारुतीच्या मूर्तीस नागवेलीची पाने व सुक्‍या मेव्याने आकर्षकरीत्या सजविण्यात आले होते.

खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी (ता. दहा) हजारो भाविकांनी येथील जागृत देवस्थान भद्रामारुतीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भद्रामारुतीच्या मूर्तीस नागवेलीची पाने व सुक्‍या मेव्याने आकर्षकरीत्या सजविण्यात आले होते. हे विलोभनीय रूप पाहून भाविक तृप्त झाले होते.

खुलताबाद येथे दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली होती. जय श्रीराम, भद्रा हनुमान की जय, पवनपुत्र हनुमान की जय, बजरंग बलीकी जय म्हणत भाविक दर्शन घेत होते. मंदिर परिसरात अनेक भाविकांनी महाप्रसाद, फराळ चहापाणी, वैद्यकीय सुविधा ठिकठिकाणी करण्यात आली होती. शुक्रवारी (ता. नऊ) रात्री औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून पायी येणाऱ्या भाविकांची वर्दळ सुरू झाली. रात्री पायी येणारे भाविक मोठ्या संख्येने असल्याने शहराकडे येणारे सर्व मार्ग भाविकांनी भरून गेले होते.

मार्गावर ठिकठिकाणी पायी येणाऱ्या भाविकांसाठी चहापाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्रीपासूनच शहरात जय भद्राचा जयघोष सुरू झाला होता. सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी वाढल्याने दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना संस्थानतर्फे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे, पुजारी बंडू गुरू हे भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेत होते. पोलिस निरीक्षक चंदन इमले व त्यांचे सहकारी भाविकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत होते. पूजा साहित्य, उपाहारगृह व खेळणी दुकाने व्यावसायिकांनी श्रावणी शनिवारनिमित्त सजविली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees visited bhadra maruti temple