Foot Pilgrimage (Dindi) to the Sacred Site of Alandi
sakal
कायगाव - श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कै. गुरुवर्य जडभरतगिरी महाराज, कै. भक्तराज कन्हैयालाल महाराज मुंदडा यांच्या कृपाशीर्वादाने अमळनेर (ता. गंगापूर) येथील श्री संत नागेबाबा संस्थानचे मठाधिपती मारोती महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी मंगळवारी (ता. २४) सकाळी ९.३० वाजता छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर - पुणे महामार्गाने भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाली. हे दिंडीचे १८ वे वर्ष आहे.