

Yavatmal News
esakal
धाड: अन्नातून विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू झाला तर आई अत्यवस्थ आहे. ही घटना बुलडाणा तालुक्यातील धाड येथे सोमवारी (ता. ६) सकाळी उघडकीस आली. या चौघांची ही प्रकृती चार एप्रिलपासून बिघडली होती. त्यानंतर पाच एप्रिल रोजी धाड येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. यापैकी दोन चिमुकल्यांचा मृत्यू सोमवारी रोजी सकाळी झाला. तर सायंकाळी उपचारादरम्यान आणखी एक मुलगी दगावली.