esakal | धनंजय मुंडे भावूक... 'कठीण प्रसंगी जी साथ दिली त्याचं आभार मी शब्दात मानू शकत नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

dhanajay munde

काही काळानंतर रेणू शर्माने बलात्काराची केस माघारी घेतली होती. त्यानंतर याविषयी बोलण्याचे मुंडेंनी बऱ्याचदा टाळलं होतं

धनंजय मुंडे भावूक... 'कठीण प्रसंगी जी साथ दिली त्याचं आभार मी शब्दात मानू शकत नाही'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

बीड: मागील काही दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसले होते. मुंबईतील रेणू शर्मा या महिलेने मंत्री मुंडेंवर बलात्काराचे आरोप केले होते. त्यामुळे राज्यभरात भाजपने याचा फायदा उठवून रान पेटवलं होत. ठिकठिकाणी आंदोलनं, राजीनाम्याच्या मागण्या आणि समाज माध्यमांवरील टीकांना मुंडेंना सामोरं जावं लागलं होतं. 

काही काळानंतर रेणू शर्माने बलात्काराची केस माघारी घेतली होती. त्यानंतर याविषयी बोलण्याचे मुंडेंनी बऱ्याचदा टाळलं होतं. पण एका कार्यक्रमात धनंजय मुंडे या प्रकरणावर बोलते झाले आहेत. अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांनी, लोकांनी आणि जवळच्या व्यक्तींनी साथ दिली याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया,‘मी राजकीय भांडवल केले...

काय म्हणाले धनंजय मुंडे-

तुमच्या सर्वांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी असे आहेत जसे एखाद्या भगवंताचा तो प्रसाद आहे. अशा कठीण प्रसंगी तुम्ही लोकांनी माझ्या पाठीशी जी साथ उभी केली त्याबद्दल मी शब्दानं ते आभार मानू शकत नाही. पण एक सांगतो आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगाच्या कातड्याचे जोडे करून जरी घातले तरी ते फिटू शकत नाही, याची मला जाणीव आहे. आजपर्यंत अनेक संकटांना सामोरं गेलो. सामान्य माणसांच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहचलो आहे. जिवनामध्ये मी कुनाचं मन दुखवून स्थान निर्माण केलं नाही तर मन जिंकून स्थान निर्माण करणारा मी व्यक्ती आहे.

क्रीडा विद्यापीठ पुण्यात नव्हे औरंगाबादेतच, पालकमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही 

धनंजय मुंडेंवरील आरोपाचे राजकीय भांडवल केले नसते- 
धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. याविषयी पंकजा मुंडेनी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा म्हणाल्या, हा विषय मागे पडला आहेत. सैद्धांतिक, नैतिक, तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या याचे समर्थन करू शकत नाही. अशा प्रकारामुळे एखादे कुटुंब, त्या कुटुंबातील दोष नसलेल्या मुलांना त्रास होतो. नाते म्हणून आणि एक महिला म्हणून याकडे सैद्धांतिक दृष्टीने पाहते. हा विषय कोणाचाही असता, तरीही याचे राजकीय भांडवल केले नसते अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

(edited by- pramod sarawale)

loading image