
Ajit Pawar: संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या जवळचे लोक सुनावणीच्या दिवशी कोर्टाच्या आवारात फिरत असतात, असं यापूर्वीच धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे. परंतु सोमवारच्या सुनावणीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक आणि वकिलांचा फौजफाटा कोर्टात होता. आरोपीचं समर्थन करणारे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत, असा आरोप देशमुखांनी केलाय.