बीड - पवनचक्की खंडणी प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येच्या घटनेचा सुत्रधार आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करावा, आरोपींना फाशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून बाजूला काढावे..तसेच धनंजय मुंडे हेच म्होरक्यांचे आश्रयदाते असल्याचा आरोप शनिवारी (ता. २८) येथे निघालेल्या सर्व पक्षीय, सर्व जातीय मोर्चातून विविध पक्षांच्या नेत्यांनी केला. खासदार बजरंग सोनवणे यांनी तर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या घरात असल्याचा आरोप करत पोलिस त्यांच्या घरी का जात नाहीत, असा सवाल केला..ता. नऊ डिसेंबरला मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निघुण हत्या करण्यात आली. ज्या अवादा कंपनीच्या पवनचक्कीसाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागीतली. त्या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गुन्हा नोंद आहे.या दोन गुन्ह्यांसह पवनचक्कीवर मारहाण आणि येथीलच दलित वॉचमनला मारहाणीवरुन अॅट्रॉसिटी असे चार गुन्हे नोंद आहेत. या चारही गुन्ह्यांचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. या चार गुन्ह्यांत नऊ आरोपी असून पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. खुनातील सुदर्शन घुले, खंडणीतील वाल्मिक कराडसह अन्य तिघे फरार आहेत..खुनाच्या घटनेला २० दिवस लोटूनही आरोपींना अटक केली जात नाही, वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा नोंद करावा, आदी मागण्यांसाठी शनिवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्व पक्षीय व सर्व जातीय मोर्चा निघाला. मोर्चाला उदंड प्रतिसाद मिळाला. हातात विविध मागण्यांचे फलक घेत महिलांनीही सहभाग नोंदविला..संभाजीराजे छत्रपती, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील प्रतोद डॉ. जितेंद्र आव्हाड, भाजप आमदार सुरेश धस, भाजपचे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील, शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे, पँथर सेनेचे दिपक केदार, रमेशराव आडसकर आदींसह इतर पक्षांच्या नेते तसेच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी, मुलगा विराज, भाऊ धनंजय यांचीही यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती..संभाजीराजेंसह सत्तापक्षांच्या नेत्यांचाही मुंडेंवर रोखसंभाजीराजे छत्रपती यांनी म्होरक्या वाल्मिक कराडचे आश्रयदाते धनंजय मुंडेच असल्याने त्यांना मंत्रीपद देऊ नये असे आपण म्हणालो होतो. आताही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रयांनी त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. त्यांना पालकमंत्रीपद दिले तर छत्रपती घराणे जिल्ह्याचे पालकत्व स्विकारेल, असे ते म्हणाले..प्रकाश सोळंके यांनी तर वाल्मिक कराडला पालकमंत्रीपदाचे सर्वाधिकार होते. त्यातूनच त्याने प्रशासनावर जरब बसविल्याचा आरोप करत मुंडेंना मंत्रीमंडळातून काढण्याची मागणी केली. सुरेश धस यांनीही पालकमंत्रीपदासह जिल्हा नियोजन समिती व कृषीमंत्रीपद वाल्मिक कराडला भाड्याने दिल्याचा आरोप केला. आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर जिल्ह्याचा सत्यानाश केल्याचा आरोप केला..एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढू - वैभवीमाझे वडिल शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढले. दलित बांधवासाठी ते पुढे गेल्यामुळे हा प्रसंग घडला. काल आभाळ असल्याने सुर्य दिसत नव्हता, आज दिसतोय पण माझे वडिल कधीही दिसणार नाहीत. त्यामुळे न्याय द्यावा, असे दिवंगत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी म्हणाली. अन्यायाच्या विरोधात आपण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढू, सोबत रहा, असे आवाहन करताना तिला हुंदके फुटले..मुख्यमंत्री दुश्मन; विरोधक सासरे नाहीत - जरांगेयेथील सर्व सत्ताधारी व विरोधक नेत्यांनी मुख्यमंत्रयांची भेट घ्यावी आणि मागण्यांची पुर्तता करुन घ्यावी, आपण तुमच्या मागे आहोत. अभिमन्यू पवारांना कोट करत तुम्ही मुख्यमंत्रयांच्या जवळचे आहात, तुमचे नेते माझे दुश्मन नाहीत आणि विरोधक सासरे नाहीत. जो समाजाला न्याय देईल, आपण त्यांच्या सोबत असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्रयांना सांगा असले मंत्री का सांभाळता, ते साप आहेत त्यांना दुध पाजू नका, असेही जरांगे म्हणाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.