esakal | Vidhan Sabha 2019 : गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे नतमस्तक; पंकजांविरुद्ध लढाई

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde going to filed nomination form for Maharashtra vidhansabha 2019

परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज (गुरुवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले.

Vidhan Sabha 2019 : गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे नतमस्तक; पंकजांविरुद्ध लढाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परळी : परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज (गुरुवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले. तसेच त्यांनी त्यापूर्वी परळी वैजनाथ येथे जाऊन पूजा केली.

'जनसामान्यांसाठी लढत राहण्याचा, संघर्ष करत राहण्याचा वारसा ज्यांच्याकडून मला मिळाला ते माझे आप्पा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृती स्थळाचे गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले.' असे ट्विट धनंजय यांनी केले आहे. 

धनंजय मुंडे म्हणाले, की गेली दहा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना संधी मिळाली त्यांच्या मंत्रिपदाचा फायदा मतदारसंघाला झालेला नाही. आम्ही फक्त आणि फक्त विकास या मुद्द्यावरच लढणार आहे. परळी मतदारसंघात काहीही बदल झालेला नाही. 2014 मध्ये दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. भाजपच्या जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण झालेली नाही. कुणा व्यक्तिविरोधात ही लढाई होणार नाहीत.