
Dhananjay Munde Latest News: मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय, असं म्हणणाऱ्या प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी ठाण्यात आयोजित वंजारी समाजाच्या मेळाव्यामध्ये बीड जिल्ह्याच्या बदनामीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला प्रकाश सोळंकेंनी उत्तर दिलं.
बीड जिल्ह्याची बदनामी कोणी केली हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.. जिल्ह्यात निर्घृणपणे हत्या केल्या जातात आणि त्यावर आम्ही बोललो की, जिल्ह्याची बदनामी होते.. असं बोलणं चुकीचं आहे, असं प्रकाश सोळंके म्हणाले.