Vidhan Sabha 2019 : सहानुभूती मिळविण्याचा प्रकार जनतेसमोर : धनंजय मुंडे

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ-बहिणीमध्ये खरी लढत होत आहे. त्यातच याबाबत धनंजय मुंडे यांनी भाष्य केले.

परळी : परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ-बहिणीमध्ये खरी लढत होत आहे. त्यातच याबाबत धनंजय मुंडे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून परळीत घड्याळाचा गजर सुरु आहे. सहानुभूती मिळविण्याचा जो प्रकार घडला हे जनतेसमोर आलेले आहे.  

धनंजय मुंडे म्हणाले, की मतदारसंघात परिवर्तन होणार आहे. ज्यांनी वाईट केले, सहानुभूती मिळविण्याचा जो प्रकार घडला हे जनतेसमोर आलेले आहे. 24 तारखेला निकालातून पराभव कोणाचा होईल, हे स्पष्ट होईल. तसेच चित्रा वाघ यांनी मुंडे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्याबाबत मुंडे म्हणाले, चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रियेचे मला काही विशेष वाटत नाही. चित्रा वाघ या आता भाजपमध्ये आहेत. त्यांना अशा स्वरूपाची प्रतिक्रिया देणे भाग आहे.

तसेच मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली. आता परतीचा पाऊस जिल्ह्यात सुरु होणार आहे, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde on sympathy issue Maharashtra Vidhan Sabha 2019