
अंबाजोगाई : लिंबोटा (ता.परळी) येथे गुंडाच्या अमानुष्य मारहाणीत गंभीर जखमी झालेला शिवराज दिवटे हा अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना (ता.१८)रविवारी खा. बजरंग सोनवणे मनोज जरांगे, दीपक केदार यांच्या भेटी पाठोपाठ परळी मतदारसंघाचे आमदार व माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवटेची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून मारहाणीचा तपशील समजावून घेतला.