Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

बीड व लातूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-ब वरील लोखंडी सावरगाव ते लातूर रोडवरील बर्दापूर फाटा या दोनपदरी रस्त्याचे आता चौपदरीकरण होणार आहे.
mla dhananjay munde

mla dhananjay munde

sakal

Updated on

परळी वैजनाथ - परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील बीड व लातूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-ब वरील लोखंडी सावरगाव ते लातूर रोडवरील बर्दापूर फाटा या दोनपदरी रस्त्याचे आता चौपदरीकरण होणार आहे. या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून, सुमारे १७.५० किलोमीटर लांबीच्या या कामासाठी १०४.४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कामाची निविदाही प्रसिद्ध झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com