Paithan Water Crisis: धरण उशाला कोरड घशाला..! पैठण तालुक्यातील अठ्ठावीस हजार नागरिकांची तहान भागवण्यासाठी सोळा टँकर

जायकवाडी धरण भरले तरी पैठण तालुका टॅंकरवर; ११ गावांत पाणीपुरवठा योजना ठप्प, २७ हजारांहून अधिक नागरिकांची तहान अजूनही भागलेली नाही
Paradox of Plenty: Paithan Villages Face Acute Water Crisis Despite Jayakwadi Dam

Paradox of Plenty: Paithan Villages Face Acute Water Crisis Despite Jayakwadi Dam

Sakal

Updated on

पाचोड: पावसाने सरासरी ओलांडूनही बेसुमार वाळू व पाणी उपशामुळे पैठण तालुक्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले असून कोट्यावधी रुपये खर्चुन कार्यान्वित केलेल्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याने अकरा गावांत पाण्याचे 'दूर्भिक्ष्य' निर्माण होऊन २७ हजार ९७७ नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनावर सोळा टँकरच्या २९ खेपाद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्याची नामुष्की ओढवली. तालुक्यातील सर्व जलसाठे तुडूंब असतांनाही टँकर सुरू झाल्याने "धरण उशाला अन् कोरड घशाला" म्हणण्याचा दुर्दैवी प्रसंग तालुक्यातील नागरिकांवर ओढवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com