Farmers Face Economic Difficulties After Crop Loss
esakal
भूम: धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने अनेक भागांत कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली जात असली, तरी शासनाकडून पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला अद्याप ठोस आदेश मिळाले नसल्याचे चित्र आहे.