

Dharashiv News
esakal
धाराशिव: एकीकडे वाहनांची सततची वर्दळ आणि दुसरीकडे रस्त्यालगत साचलेले घाण पाणी. यामुळे नागरिक, प्रवासी आणि वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी अतिक्रमणे हटवूनही नालीचे काम न झाल्याने शासनाचा खर्चही पाण्यात गेला असून परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. बसस्थानकाच्या पश्चिमेकडील रस्त्यालगत असलेल्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी व्यवस्थेकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.