

Dharashiv News
esakal
धाराशिव: बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गालगतच्या साइडपट्टीवरून वाहणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात आल्याने प्रवासी, व्यापाऱ्यांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे अनेक महिन्यांपासून अस्वच्छतेतून व्यापारी व नागरिकांची सुटका झाली आहे. नागरिकांच्या गैरसोयीसंदर्भात ‘सकाळ’मध्ये सात एप्रिलला वृत्त प्रसिद्ध होताच खडाडून जागे झालेल्या संबंधित विभागाने स्वच्छतेचे काम केल्याने तीन दिवसांपासून साइडपट्टी कोरडी आहे.