Dharashiv News : धाराशिव येथे लाडक्या लेकीच्या लग्नात पित्याचा सामाजिक संदेश; ५१ जणांचा सहभाग
blood donation drive : धाराशिवमध्ये एका वधूपित्याने मुलीच्या लग्नात रक्तदान शिबिर आयोजित करून समाजाला सामाजिकतेचा अनोखा संदेश दिला. या उपक्रमात ५१ वऱ्हाड्यांनी रक्तदान करून नवरीस आगळावेगळा आहेर दिला.
धाराशिव : पित्याने लाडक्या लेकीच्या लग्न सोहळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनोखा सामाजिक संदेश दिला. उपस्थित वऱ्हाडी मंडळींपैकी ५१ जणांनी रक्तदान करीत नवरी मुलीला आगळावेगळा आहेर केला. त्यामुळे या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा होत आहे.