

Dharashiv News
esakal
धाराशिव: जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून डीएपी, युरिया खताची मागणी आहे. जिल्ह्यात या खतांचा साठा उपलब्धही दिसत आहे; मात्र, प्रत्यक्षात शहरातील एकाही कृषी सेवा केंद्रात ही खते शिल्लक नाहीत, असे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांनी युरिया आहे का, अशी विचारणा केल्यानंतर ‘नाही, असे उत्तर मिळत आहे. त्यावर डीएपी आहे का तर तेच ठरलेले उत्तर. असेच चित्र जिल्ह्यात असून, त्या बदल्यात पर्यायी महागडी खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याचे गुरुवारी (ता. नऊ) ‘सकाळ’ने केलेल्या ‘स्टिंग’मध्ये आढळून आले. त्यामुळे कोणी युरिया, डीएपी देतं का? अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.