Dharashiv News: गॅस सिलिंडरसाठी एजन्सीच्या दारातच रात्रभर मुक्काम; पोळी-भाजी नव्हे, तर पावभर द्राक्ष खाऊन भागवली भूक.

Severe LPG Shortage Hits Dharashiv District: धाराशिव जिल्ह्यात गॅस सिलिंडर टंचाई गंभीर बनली असून नागरिकांना रात्रभर एजन्सीसमोर थांबण्याची वेळ आली आहे.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: ‘घरातला गॅस कालच संपला हो...! रिकामं सिलिंडर घेऊन सकाळी लवकरच शहरात आलो. दुपारपर्यंत रांगेत उभा होतो. पण साठा संपल्याचं सांगण्यात आलं. आता रिकाम्या हाताने गावी कसं जाणार? म्हणून इथंच एजन्सीच्या बाहेर रात्रीचा मुक्काम ठोकला. जेवणही केलं नाही. केवळ द्राक्षं खाऊन रात्र काढली. आता तुम्हीच सांगा, पोळी-भाजीची सर द्राक्षाला कशी येणार? पण सिलिंडर पाहिजेच म्हणून पहाटं पुन्हा नंबर लावला. तेव्हा कुठं आज सकाळी हातात गॅस सिलिंडर मिळालं. पोटात दोन घास घालण्यासाठी असे चटके सोसावे लागतायत बघा...!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com