Dharashiv News: धाराशिव शहरात व्यावसायिक गॅस टंचाई; हॉटेल्सना लाकडाच्या चुलीवर विसंबावे लागले

Gas Shortage Hits Dharashiv Businesses: धाराशिव शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात घट झाल्यामुळे हॉटेल्स आणि खाणावळीवर परिणाम झाला आहे. घरगुती गॅस मिळत नसल्याने व्यवसायीक आणि गृहिणींनी पुन्हा लाकडाच्या चुलींचा वापर सुरू केला आहे. परिणामी लाकडाची मागणी वाढली असून दरही २० टक्क्यांनी वाढले आहेत, शहरात अर्थचक्रावर ब्रेक लागला आहे.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: गेल्या काही दिवसांपासून धाराशिव शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात मोठी घट निर्माण झाली आहे. ऐन गर्दीच्या आणि सणासुदीच्या काळात हॉटेलचालकांना गॅस मिळेनासा झाल्याने शहरातील हॉटेल्स आणि खाणावळींच्या अर्थचक्राला ब्रेक लागला आहे. गॅसला पर्याय म्हणून आता पुन्हा एकदा ‘चुली’ पेटू लागल्या असून, यामुळे शहरात लाकडांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com