Dharashiv News: कडाक्याच्या उन्हात महावितरणचा ‘शॉक’; विजेचा लपंडाव, उकाड्याने धाराशिवकर हैराण

Frequent Technical Faults Disrupt Electricity Supply: धाराशिव शहरात महिनाभरापासून वीजपुरवठा खंडित; उकाड्याने नागरिक त्रस्त, पिकांवर आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम, महावितरणच्या लहरी कारभारावर संताप.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: गेल्या आठवडाभरापासून उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याने धाराशिवकरांच्या जिवाची घालमेल होत आहे. त्यातच वीज वारंवार गुल होत असून, कूलर, पंखे बंद राहत असल्याने उकाडा असह्य होत आहे. महिनाभरापासून धाराशिव शहरासह तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

रणरणत्या उन्हात उकाड्याने नागरिक आधीच हैराण असताना महावितरणच्या लहरी कारभारामुळे या त्रासात अधिकच भर पडली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावरही याचा गंभीर परिणाम होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com