Rabi Sowing: ओलाव्याअभावी रब्बी पेरण्या संकटात; धाराशिवमध्ये ७० ते ७५ टक्के क्षेत्र घटण्याची भीती

Dharashiv Rabi Sowing, Sorghum Crop, Gram Production : धाराशिव जिल्ह्यात परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून रब्बी पेरण्या संकटात सापडल्या आहेत. पाऊस न झाल्यास पेरणी क्षेत्रात ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता असून ज्वारी, हरभरा आणि उन्हाळी चारा उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.
Lack of soil moisture and delayed rainfall threaten Rabi sowing and sorghum and gram production in Dharashiv district.

Lack of soil moisture and delayed rainfall threaten Rabi sowing and sorghum and gram production in Dharashiv district.

esakal

Updated on: 

धाराशिव : परतीचा पाऊस हुलकावणी देऊन गेल्यामुळे जमिनीत पुरेशी ओल नाही आणि त्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. परिणामी, यंदा जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरण्या मोठ्या संकटात सापडल्या आहेत. जमिनीत ओल नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या टाळल्या आहेत. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी धाडस करून कमी ओलीवर पेरण्या केल्या, तेथे बियाण्यांची उगवण अत्यंत नगण्य आहे. अशीच स्थिती राहिल्यास आणि पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास यंदा जिल्ह्यातील रब्बी पेरण्यांचे क्षेत्र ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत घटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश शेतजमिनी पेरणीअभावी पडीक राहून ज्वारी, हरभऱ्याच्या उत्पादनात यंदा विक्रमी घट येण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com