Dharashiv News: धाराशिवमध्ये आरटीई प्रवेशासाठी १,९४३ अर्ज; जागांपेक्षा स्पर्धा वाढली; २५ टक्के प्रवेशासाठी अर्जांची गर्दी; २५ मार्चपर्यंत मुदतवाढ
RTE Admission Applications Rise in Dharashiv: धाराशिव जिल्ह्यात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १,९४३ ऑनलाइन अर्ज दाखल झाले असून १,२८६ जागांसाठी स्पर्धा वाढली आहे. अर्जाची मुदत २५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली असून पालकांकडून पोर्टलवरील तांत्रिक अडचणींबाबत तक्रारी होत आहेत.
धाराशिव: आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातून सोमवारी (ता. १६) सायंकाळपर्यंत एक हजार ९४३ ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात ११२ शाळांमध्ये एक हजार २८६ जागा आहेत.