Monsoon Update : धाराशिवमध्ये १६ दिवसांपासून कोसळधारा! वार्षिक सरासरीच्या ४९ टक्के पाऊस, २४ तासांत १३ मंडळांत अतिवृष्टी
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४९% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत १३ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
धाराशिव : जिल्ह्यात गेल्या सोळा दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरूच असून, शुक्रवारी सकाळपर्यंत (ता. ३०) वार्षिक सरासरीच्या २९८.४ मिलिमीटर म्हणजे ४९.४८ टक्के पाऊस नोंदला गेला. गेल्या २४ तासांत १३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.