Dharashiv News: धाराशिवच्या ६७ विद्यार्थ्यांचे ‘इस्रो’कडे उड्डाण; शैक्षणिक सहलीसाठी रवाना; आविष्कार अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव

Students Depart for ISRO Educational Tour: धाराशिव जिल्हा परिषद शाळेतील ६७ विद्यार्थी राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत इस्रो, केरळ व बंगळूर शैक्षणिक सहलीसाठी रवाना झाले.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानात न रमता संशोधक वृत्ती जोपासावी आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात आपले नाव उजळवावे, या उद्देशाने राष्ट्रीय आविष्कार अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांतील ६७ गुणवंत विद्यार्थी रविवारी (ता. १५) ‘इस्रो’च्या शैक्षणिक सहलीसाठी रवाना झाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनांक घोष यांनी या सहलीच्या बसला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com