Dharashiv Tiger Return: धाराशिवमध्ये पुन्हा वाघाची डरकाळी, येडशी अभयारण्याकडे जाण्याचा अंदाज; वन विभागाचे सतर्कतेचे आवाहन

Tiger Returns to Dharashiv After Seven Months: वाशी तालुक्यातील घाटपिंप्री येथे ठसे आढळल्यानंतर वन विभागाने सतर्कतेचे आवाहन केले असून वाघ येडशी रामलिंगघाट अभयारण्याकडे जाण्याची शक्यता आहे.
Dharashiv Tiger Return

Dharashiv Tiger Return

esakal

Updated on

धाराशिव: सात महिन्यांपासून गायब झालेल्या वाघाने पुन्हा एकदा जिल्ह्यात पुनरागमन करीत डरकाळी फोडली. वाशी तालुक्यातील घाटपिंप्री येथे वाघाच्या पायाचे ठसे (पगमार्क्स) आढळल्याने तो धाराशिवच्या सीमाभागात परतल्याची पुष्टी झाली. बीड जिल्ह्यातील बालाघाट परिसरातून त्याने धाराशिव जिल्ह्यात प्रवेश केला. आता तो जिल्ह्याच्या दक्षिण भागातील येडशी रामलिंगघाट अभयारण्याकडे कूच करण्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com