Dharashiv News: काढणीला आलेला घास पाण्यात! धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

Unseasonal Rain Hits Dharashiv District: धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी व फळबागांचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांची पंचनाम्याची मागणी.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असतानाच गुरुवारी (ता. १९) दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. दुपारी अडीच ते चारच्या सुमारास धाराशिव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वाशी तालुक्यात विजोरा परिसरात गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या, काढून ठेवलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com