

Dharashiv News
esakal
धाराशिव: शहरातील दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात व्यापाऱ्यांसाठी जागा अपुरी ठरत आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गालगतच्या उपलब्ध जागेत भाजीपाल्यांची विक्री करावी लागत आहे. त्यातच बाजारात येणाऱ्या ग्राहकांसह व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा नसल्यामुळे दुचाकी वाहने थेट महामार्गावरच उभी केली जात असल्याने तेथे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.