Parthsarathi Munde
sakal
- धनंजय शेटे
भूम - जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील खेळाडूही राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात, हे भूम तालुक्यातील हिवरडा गावची कन्या पार्थसारथी अरुण मुंडे हिने आपल्या दमदार कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात अजिंक्यपद पटकावत पार्थसारथीने घवघवीत यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे हिवरडा गावासह भूम तालुका आणि धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.