
किल्लेधारूर : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख सतत गरजूंच्या मदतीला धावून जाणारे होते. अशा आदर्श सरपंचांची हत्या करण्यात आली. देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी किल्लेधारूर शहरात शुक्रवारी नागरिकांनी मदत फेरी काढली होती. धारूरकरांनी दोन तासात तीन लाख १३ हजार रुपये जमा केले.