Dharur Ghat Accidents: धारूर घाटात अपघातांची मालिका कायम; जिल्हाधिकाऱ्यांच्या दुरुस्ती आदेशाला विलंब, नागरिकांमध्ये संताप

धारूर घाटातील अरुंद रस्ता, धोकादायक वळणे आणि उंच-सखल भागामुळे अपघातांची मालिका; जिल्हाधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीच्या आदेशांनाही प्रत्यक्ष कामाचा मागमूस नाही
A pickup truck catches fire after plunging into a valley, while a tanker overturns on the accident-prone Dharur Ghat in Beed district, highlighting the urgent need for road repairs and safety measures.

Sakal

Updated on

ईश्वर खामकर

किल्लेधारूर (बीड) : धारूर शहरातून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारूर घाटात अपघातांची मालिका सुरूच असून, घाटाच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश अद्याप कागदावरच असल्याचे चित्र आहे. घाटातील अरुंद रस्ता, धोकादायक वळणे, रस्त्यावरील उंच-सखल भाग आणि अपुऱ्या सुरक्षिततेमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. १५ ऑगस्टच्या पहाटे आणि सकाळी या घाटात दोन वेगवेगळे अपघात झाले. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com