22-Year-Old Doctor Enters Local Politics
Sakal
मराठवाडा
Beed Election : तरुणाईच्या हाती सत्तेची धुरा; अवघ्या २२ व्या वर्षी डॉ. आकांक्षा फावडे नगरसेवक!
Youth In Politics : धारूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत अवघ्या २२ व्या वर्षी डॉ. आकांक्षा फावडे नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून त्या सर्वात तरुण नगरसेवक ठरल्या आहेत. त्यांच्या विजयामुळे शहराच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
ईश्वर खामकर
किल्लेधारूर (बीड) : धारूर नगरपरिषदेची नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दमदार कामगिरी करत अध्यक्षपदासह २० पैकी ११ नगरसेवकांच्या जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे धारूर नगरपरिषदेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती गेल्या आहेत.

