dharur nagarparishad election
sakal
किल्लेधारूर - धारूर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय तापमान चांगलेच तापले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची प्रचंड गर्दी नगरपरिषद परिसरात पाहण्यास मिळाली. नगरपरिषदेच्या २० नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार असून १७ नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती.