

Beed News
esakal
किल्ले धारूर : खामगाव–पंढरपूर या अत्यंत महत्त्वाच्या ५४८-सी राष्ट्रीय महामार्गाची धारूर घाटाखाली दयनीय अवस्था झाली आहे. आरणवाडी तलावाजवळ सुमारे ५०० मीटर अंतरावरील रस्ता पूर्णपणे उखडला असून, खड्ड्यांमुळे महामार्गाला पाणंद रस्त्याचे स्वरूप आले आहे. तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत हा मार्ग सिंगल ठेवल्याने येथे रोजच वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना घडत आहेत.