Vidhan Sabha 2019 : बीडमध्ये सोळंके, पंडित, धोंडे यांची उमेदवारी दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस व मित्रपक्षाचे गेवराई मतदार संघातील उमेदवार विजयसिंह पंडित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, माजलगावमधून राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंके यांनी तर, आष्टीतून भाजपच्या भिमराव धोंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस व मित्रपक्षाचे गेवराई मतदार संघातील उमेदवार विजयसिंह पंडित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, माजलगावमधून राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंके यांनी तर, आष्टीतून भाजपच्या भिमराव धोंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

तत्पुर्वी, विजयसिंह पंडित यांनी त्यांच्या आई शारदादेवी पंडित व कुटूंबियांनी औक्षण करुन त्यांना आशिर्वाद दिले. नंतर त्यांनी गढी येथील भवानी मातेचे व तलवाडा येथील त्वरिता देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेवराईतून मोठी फेरी काढून सध्या सभा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, भाऊसाहेब नाटकर, जालिंदर पिसाळ आदींसह पदाधिकारी उपस्थित आहेत. 

माजलगाव मतदार संघातून प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातून फेरी काढून त्यांनी शक्तीप्रदर्शनही केले. यावेळी प्रचंड घोषणा देण्यात आल्या. त्यांनी निवडणुक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी धैर्यशिल सोळंके, सभापती अशोक डक सोबत होते. 

आष्टी - पाटोदा - शिरुर कासार मतदार संघातून भाजप युतीचे उमेदवार म्हणून आमदार भिमराव धोंडे यांनी गुरुवारी (ता. तीन) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरातून मोठी फेरी काढण्यात आली. उघड्या जीपमधून धोंडे फेरीत सहभागी झाले. त्यांच्या समवेत भाजप पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी नम्रमा चाटे यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhonde Solanke and pandit filed their nominations in Beed district