Dhule MIDC:एक कोटींच्या लाच प्रकरणातील आरोपी अभियंता गणेश वाघ 'फरार', ACBकडून लुक आऊट नोटीस जारी

एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील दुसरा आरोपी कार्यकारी अभियंता गणेश वाघ अद्यापही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागलेला नाही.
Dhule MIDC:एक कोटींच्या लाच प्रकरणातील आरोपी अभियंता गणेश वाघ 'फरार', ACBकडून लुक आऊट नोटीस जारी
Updated on

Ahmednagar News: एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील दुसरा आरोपी कार्यकारी अभियंता गणेश वाघ अद्यापही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागलेला नाही. वाघ याला अटक करण्यासाठी एसीबीने चांगलीच ‘नाकेबंदी’ केली आहे.

राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांवरील टोलनाक्यांवर वाघ याच्या वाहनांचे क्रमांक देण्यात आले आहेत. त्यानंतर आता वाघला जेरबंद करण्यासाठी लुकाऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. वाघ नेमका कुठे लपून बसला, असा प्रश्न एसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर आहे.

आरोपी वाघ देशाबाहेर जाऊ नये, यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.७) विमानतळ प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला असून, लुकाऊट नोटीस जारी करण्यात आल्याचे सांगितले. वाघ सध्या धुळे येथे एमआयडीसीमध्ये कार्यकारी अभियंतापदावर कार्यरत आहे. त्याच्या संपर्कात कोणी आहे का, याचाही तपास एसीबीकडून घेतला जात आहे. (Latest Marathi News)

Dhule MIDC:एक कोटींच्या लाच प्रकरणातील आरोपी अभियंता गणेश वाघ 'फरार', ACBकडून लुक आऊट नोटीस जारी
Kartiki Ekadashi : "कार्तिकी यात्रेसाठी उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही", मराठा आंदोलक आक्रमक; मंदिर समितीचा सावध पवित्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com