
धाराशिव : शहरातून गेलेल्या धुळे-सोलापूर महामार्गावर सेवा रस्ता नसल्याने डी-मार्टसमोर महामार्गावर सहावीतील विद्यार्थ्याचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर महामार्गाचे काम करणाऱ्या कंपन्या आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात शहरातील नागरिक, पालकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. महामार्गाचे काम करणारी संबंधित कंपनी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिक आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.