ST Bus Fire : धावत्या एसटी बसने घेतला पेट; कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४० प्रवाशांचे वाचले प्राण

पिंपळगाव–पांढरी शिवारातील थरारक घटना; बस क्षणात जळून खाक, दोन महिलांचे जळालेले दागिने पोलिसांनी परत केले.
Moving ST bus catches fire

Moving ST bus catches fire

sakal

Updated on

आडूळ - धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव धावणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, बसच्या मागे येणाऱ्या एका कार चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तब्बल ४० प्रवाशांचे प्राण वाचले. प्रवाशांना वेळेत खाली उतरविल्यानंतर काही क्षणांतच बसने भीषण पेट घेत पूर्णतः जळून खाक झाली. ही थरारक घटना शुक्रवारी (ता. १७) सकाळी आठच्या सुमारास पिंपळगाव–पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com