परळी वैजनाथ - गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा फौजेत भरती झाल्याबद्दल ट्रेनिंग पूर्ण करुन गावात आल्यावर गावकऱ्यांच्या वतीने तरुण फौजीचे ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले..तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक दिव्यांग शेतकरी राजाभाऊ राडकर यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. ते अवघ्या दोन एकर शेतीवर आपला प्रपंच चालवत मुलांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. मुलगी बीएस्सी प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. राजाभाऊ राडकर यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रसंगी शेतीत कमी खर्च केला. पण मुलांना शिक्षणासाठी पैसा खर्च केला. मुलानेही आपल्या वडीलांचे कष्ट वाया जावू न देता. मेहनतीने फौजेत भरती झाला..अर्जुन राजाभाऊ राडकर याचे शालेय शिक्षण गावातील विवेकानंद विद्यालयात झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण गावापासून जवळच असलेल्या सिरसाळा येथील मालनबाई देशमुख उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. १२ वीला असतानाच गावातील काही युवक पोलीस भरतीमध्ये यशस्वी झाले होते. त्यांच्याकडे पाहून आपल्यालाही एक दिवस वर्दी घालण्याचा निश्चय अर्जुनने केला. व पोलीस भरतीची तयारी सुरू केली. पण ग्राऊंड मध्ये अपयश आले..ही तयारी करत असताना भारतीय सैन्यात भरती निघाली. अहिल्यानगर येथे भरतीसाठी गेलो पण रनिंग मध्ये अपयश आले. दोन वेळा अपयश आले पण आत्मविश्वास कमी होवू दिला नाही. कारण काही करुन मला वर्दी घालायची होती. पुढे लातूर येथे जावून सेल्फस्टडी सुरू केली. याचवेळी सैन्यात भरती निघाली. या भरतीमध्ये लेखी परीक्षा पास झालो. २३ नोहेंबरला ग्राडंड झाले. मार्च २०२४ मध्ये माझे सलेक्शन झाले..एप्रिल मध्ये ट्रेनिंगला सुरुवात झाली.तीन महिने बेसिक मिलीटरी ट्रेनिंग यामध्ये रायफल रिपेअर, फायरिंग, जंगल कँम्प,टँक रिपेअर आदिंची ट्रेनिंग देण्यात आली. परेड नंतर पूर्ण फौजी झालो.आता पंजाब पठाणकोट येथे नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान मंगळवारी (ता. ०४) ट्रेनिंग करुन पहिल्यांदाच अर्जुन गावात आल्याने गावकऱ्यांनी अर्जुनची भव्य मिरवणूक काढत ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. त्याच बरोबर ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभागृहात गावकऱ्यांच्या वतीने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील जेष्ठ मंडळींच्या हस्ते अर्जुन व वडील राजाभाऊ राडकर यांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला..गाढे पिंपळगाव बनतेय पोलीसांचे गावगाढे पिंपळगाव येथे पहिल्यांदा ज्ञानेश्वर राडकर पोलीस उपनिरीक्षक म्हणून राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून निवड झाल्यानंतर आपणही पोलीस प्रशासनात गेले पाहिजे, याच प्रेरणेतून आज जवळपास १५ च्या वर युवक पोलीस म्हणून सेवा देत असून दोघे पोलीस उपनिरीक्षक, तीन ते चारजण सैन्यात गेल्या पाच सहा वर्षांत भरती झाले आहेत यामुळे गाढे पिंपळगावची ओळख पोलीसांचे पिंपळगाव अशी होत चालली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.