

No cremation road, villagers protest outside gram panchayat.
Sakal
कन्नड : तालुक्यातील पिशोर-दिगर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दिगर येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी (ता. ६) मृत महिलेचा मृतदेह पिशोर-दिगर ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून तेथेच सरण रचण्याची तयारी केली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दिगर येथील हरणबाई नामदेव नवले यांचे शनिवारी (ता. ५) रात्री निधन झाले.