शेतीतील नुकसान कमी करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान फायदेशीर, कसे ते वाचाच

गणेश पांडे
Tuesday, 18 August 2020

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पिक लागवडीचे नियोजन केल्‍यास शेतमाल मागणी व पुरवठा यात संतुलन साधुन शेतकरी बांधवांना योग्‍य मोबदला मिळु शकेल. भविष्‍यात किड व रोगाचा प्रादुर्भाव, नैसर्गिक व आत्‍पकालीन परिस्थितीत शेतमालाचे नुकसान होते. त्यासाठी अचुक सर्वेक्षण डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून करून शेतक-यांना योग्‍य मोबदला त्‍वरीत देणे शक्‍य आहे, असा विश्वास अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केला. 

परभणी : डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पिक लागवडीचे नियोजन केल्‍यास शेतमाल मागणी व पुरवठा यात संतुलन साधुन शेतकरी बांधवांना योग्‍य मोबदला मिळु शकेल. भविष्‍यात किड व रोगाचा प्रादुर्भाव, नैसर्गिक व आत्‍पकालीन परिस्थितीत शेतमालाचे नुकसान होते. त्यासाठी अचुक सर्वेक्षण डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून करून शेतक-यांना योग्‍य मोबदला त्‍वरीत देणे शक्‍य आहे, असा विश्वास अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केला. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्‍कृत सेंटर ऑफ एक्‍सलंस, राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) आणि आयएसए व 'आयएसजीपीबी' शाखेच्यावतीने ‘डिजीटल तंत्रज्ञानाव्‍दारे स्‍मार्ट शेती–भविष्‍यात्‍मक योजना’ यावर ऑनलाईन आतंरराष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. या परिषदेच्‍या समारोप कार्यक्रमात डॉ. विलास भाले यांचे मार्गदर्शन झाले. 

यांची होती उपस्थिती... 

या कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन रायपुर छत्‍तीसगड ये‍थील कृषि विद्यापीठाचे कुलगरू डॉ. पी. के. घोष, नवी दिल्‍ली येथील 'आयसीएआर'चे डॉ. एस. भास्‍कर, भारतीय कृषिविद्या संस्‍थेचे उपाध्‍यक्ष डॉ. यु. व्‍ही. महाडकर, ईस्‍त्राईल तंत्रज्ञान संस्‍थेचे डॉ. राफेल लिंकर, नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ. प्रभात कुमार, शिक्षण संचालक डॉ. डि. एन. गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डि. बी. देवसरकर, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाल शिंदे आदींची उपस्थिती होती. 

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढणार... 

कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले, वाढत्‍या लोकसंख्‍येला पोषक आहार, शेतकरी बांधवांना योग्‍य मोबदला, दर्जेदार अन्‍न निर्मिती, सार्वजनिक वितरण प्रणाली, प्रक्रिया व पॅकेजिंग सुविधाचे बळकटीकरण आदीकरिता डिजिटल तंत्रज्ञानाचा भविष्‍यात मोठा वापर होणार आहे. सध्याच्या कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावात मनुष्‍याचा कमीत कमी शेतकामात वावर होण्‍याच्‍या दृष्‍टीने डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल. प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डि. बी. देवसरकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. आय. ए. बी. मिर्झा व डॉ. सुनिता पवार यांनी केले. आभार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी मानले. या ऑनलाईन कार्यक्रमाचा कृषी क्षेत्रातील अनेक तज्ञांनी लाभ घेतला

संपादन : सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digital technology is beneficial in reducing farm losses said Vice Chancellor Dr. Vilas Bhale