
घनसावंगी : तालुक्यातील शिंदेवडगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी, पदवीचे (कला शाखा, अंतिम वर्ष) शिक्षण घेणारी दिपाली गणेशराव भुतेकर हिने शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी अशी काठी तयार केली असून ती विविध कामांत उपयोगात येऊ शकते. तिचा हा प्रयोग सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान तिला एका उद्योजकाने साडेपाचशे काठ्या तयार करून देण्याची ऑर्डरही दिली आहे.