
जालना : दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी, शासन परिपत्रकानुसार दिव्यांगांना व्यवसायासाठी देण्यात येणारी २०० चौरस फूट जागा वारंवार मागणी करूनही मिळत नाही, संजय गांधी निराधार योजनेतील बोगस लाभार्थींची सखोल चौकशी करण्यात यावी, दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले.