
अल्पवयीन सुने सोबत घृणास्पद आणि लज्जास्पद कृत्य केल्याची घटना बुधवारी (ता. चार) उघडकीस आली.
नांदेड : शहरातील वाजेगाव परिसरात सासूने एका १७ वर्षाच्या अल्पवयीन सुने सोबत घृणास्पद आणि लज्जास्पद कृत्य केल्याची घटना बुधवारी (ता. चार) उघडकीस आली. याप्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वाजेगाव (ता. नांदेड) येथे राहणाऱ्या एका सुनेचा मानसिक व शारिरीक छळ करत चक्क तिचा वियनभंग केला. पिडीत सुनेच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात सासु व पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हा गुन्हा भोकर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. अत्याचार व पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासू -सूनेच्या नात्याला काळीमा
एक तर अल्पवयीन मुलीचा मुलासोबत विवाह केला आणि त्या नंतर सासूने सुनेसोबत लज्जास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने पोलिसांनी या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक केली नसून, सासूकडून सूनेला त्रास दिल्याचे मारहाण केल्याच्या घटना आपण दररोज ऐकतो मात्र, सासू -सूनेच्या नात्याला काळीमा फासणारी लज्जास्पद कृत्य केल्याची घटना विचित्र मानसिकतेतून केल्याची बाब पुढे आली आहे.
हेही वाचा - परीक्षा संपेपर्यंत तिला या दुःखाची कल्पनाच नव्हती...
चक्क...! महिला पोलिसास शिविगाळ
नांदेड : दहावीच्या परिक्षा केंद्रावर कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्यास नक्कल (कॉपी) पुरविणाऱ्या युवकाने शिविगाळ केली. शासकिय कामात अडथळा निर्माण करून उद्धट बोलून धमकी दिली. हा प्रकार हिमायतनगर येथील जिल्हा परिषद शाळेवर शुक्रवारी (ता. सहा) दुपारी घडला.
हिमायतनगर येथील जिल्हा परिषद शाळेवर दहावीची परिक्षा सुरू आहे. या परिक्षा केंद्रावर कॉपीमुक्त परिक्षा व्हावी व काही कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या बंदोबस्तामध्ये महिला पोलिस हवालदार कोमल कागणे यांचाही समावेश आहे. शुक्रवारी (ता. सहा) परिक्षा केंद्रावर श्रीमती कागणे ह्या कर्तव्यावर असतांना हिमायतनगर येथील एक युवक परिक्षार्थीला कॉपी पुरविण्यासाठी आला होता.
हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
तो प्रतिंबधीत क्षेत्रात घुसून कॉपी देण्यासाठी प्रयत्न करताना श्रीमती कागणे यांनी त्याला विरोध केला. यावेळी त्याने कर्तव्यावरी महिला पोलिसास शिविगाळ करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. कोमल कागणे यांच्या फिर्यादीवरुन हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. इंगळे करत आहेत.