esakal | परभणी जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आनागोंदी कारभाराच्या तक्रारी राष्र्टवादी काॅग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे व तालुकाध्यक्ष माऊली ताठे यांनी मागील सात महिण्यांपासून वेळोवेळी दिल्या होत्या.

परभणी जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी आमदार विजय भांबळे यांनी केलेल्या तक्रारीची अखेर दखल घेत ( ता. १९ ) रोजी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीचे आदेश पारित करून  प्रशासकिय समिती नियुक्त केली आहे.

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आनागोंदी कारभाराच्या तक्रारी राष्ट्रवादी काॅग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे व तालुकाध्यक्ष माऊली ताठे यांनी मागील सात महिण्यांपासून वेळोवेळी दिल्या होत्या.या तक्रारीवरून संबधित विभागाने समिती नेमली होती.समितीने केलेल्या चौकशीत सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व सभापती दोषी आढळून आले.त्यानूसार संबधितांच्या वेगवेगळ्या सात सुनावन्या घेण्यात आल्या सुनावनीमध्ये संचालक मंडळ दोषी आढळून आले.यामध्ये माती व पाणी परिक्षण यंत्र सामुग्री जिल्हा उपनिबंधक यांच्या परवानगी शिवाय कृषी महाविद्यालय,सेलू यांना देण्यात आली.ही यंत्र सामुग्री शेतकर्‍यांच्या शेतातील माती,पाणी परिक्षण करण्यासाठी आसतांना कृषी महाविद्यालयाला दिल्याने शेतकर्‍यांची दिशाभूल करण्यात  आली.

हेही वाचाBreaking : डुकरांनी ताेडले मृतदेहाचे लचके; नांदेडकरांचा विष्णुपुरीच्या रुग्णालयावर राेष

सभापती,संचालक मंडळ व सचिव यांनी संगनमत करून पदाचा दूरूपयोग करत मनमानी कारभार केला व अनामत रक्कम न घेता भाडेकरार करून भ्रष्टाचार केला.नियमबाह्य पध्दतीने शिक्षण संस्था चालविण्यासाठी जागा व गाळे भाडेतत्वावर दिले.बेकायदा कर्मचारी भरती केली.लायसंन्स नसणार्‍यांना गाळे व जागा हस्तांतरित केल्या.मासिक सभा न घेणे.बाजार समितीचे गाळे व जागा भाडेतत्वावर संचालक मंडळला दिले.बाजार समितीची पालाशेड जागा भाडेतत्वावर देणे.

देऊळगाव ( गात ) येथिल बाजार समितिची करोडो रूपयांची चार एक्कर जमिन अल्प दरात विकून भ्रष्टाचार केला.या मुद्यांच्या आधारे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुढील सहा महिण्याकरिता प्रशासकिय समिती नियीक्त केली आहे.या समितीवर मुख्य प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे हे असणार आहेत तर प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक माधव यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image