Jalna News : वरातीमध्ये नाचण्यावरून वाद; तरुणाने संपवले जीवन
Mental Health : लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादातून जालन्यातील १६ वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. रोहन साळवे या तरुणाने मध्यरात्रीनंतर गळफास घेऊन जीवन संपवलं.
जालना : लग्नाच्या वरातीमध्ये नाचण्यावरून मित्रामित्रांत वाद झाला. या वादातून एका तरुणाने शुक्रवारी (ता.१८) मध्यरात्रीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहन राहुल साळवे (वय १६, रा. चंदनझिरा, जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.