
निलंगा : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काहींनी निवडणूक अर्ज भरताना, तर काहींनी मुदतीत जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र दाखल केले होते. मात्र, त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे अपात्र ठरविलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी थेट तहसील कार्यालयात धाव घेत ‘आम्ही दाखल केलेले जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र गेले कोठे’, असा संताप व्यक्त केला.