Beed News: अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने संपवले जीवन, केज येथील घटना, सरकार आतातरी जागे होणार का? शेतकऱ्यांचा टाहो
Crop Loss: अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने गळफास लावून जीवन संपवले. ढाकणवाडीतील रामभाऊ ढाकणे यांचा अतिवृष्टीच्या कारणामुळे मोठा आर्थिक फटका बसला होता. तालुक्यातील ढाकणवाडी येथील रामभाऊ ढाकणे हे मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने तणावात होते.
केज : अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान उघड्या डोळ्यांनी पहावत नसल्याने हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.२६) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ढाकणवाडी येथे घडली.